तन्नू 3000/- की लिवाईस की पॅन्ट जाने दे, यहाँ से मेरे लिए ४०० वाली इनरवेअरही खरीद लेते है… ।
मुलीकडे नाशिकला गेलो असता ती मला शहरातील सिटी सेंटर मॉलमध्ये जस्ट चिल्ल करण्या साठी घेऊन गेलेली होती , तिचा जस्ट पगार ही झाला होता.
फिरता फिरता आम्ही सहज लिवाइजच्या शोरुममध्ये गेलो.
मी टी शर्ट बघत होतो. मात्र मुलगी मला म्हणाली, “पापा लिवाईस की यह ट्राऊझर काफी अच्छी है.,
ले लें”? तेवढ्यात माझे लक्ष बाजुच्या काऊंटरवरील इनरवेअरकडे गेले. मी तिला सांगितले, “पॅन्ट जाऊ दे, माझ्याकडे भरपूर आहेत, मात्र इनरवेअरचा शॉर्टेज आहे. म्हणून तीच घेऊन दे.”
मूळात इनरवेअर चे नाना शेप्स, कट्स, कलर्स पाहुन आम्ही आकर्षीत होत असलो तरी किंमती बघुन त्या विकत घ्यायला माझे मन धजावत नाही. ४०० ते ४५० रुपयांची एक इनरवेअर फार महाग वाटते.
डीमार्ट किंवा बिग बाजारमधून दुसरी स्वस्तातली घेतली तर 1-2 महिन्यातच तिचे इलॅस्टिक सैल होऊन जाते. शिवाय तिच्या साईजचा विषयही क्लिअर नसतो. इनरवेअरची साईज ही सेंटीमीटरमध्ये असते आणि आपल्याला आपल्या कमरेची साईज ही इंचामध्ये माहिती असते. म्हणजे मला 32 ची पॅन्ट चालते, मात्र त्याच हिशोबाने 85 ची इनरवेअर खूप टाईट वाटते. कमरेच्या घेरे वर पोटाचा मोट्ठा घेर असतो,, आणि कदाचित त्या कारण। ने ही इलास्टिक निकामे होत असेल..शोरुमधल्या सेल्समनलाही जे शिकवले गेले असेल तो तेच सांगतो. विकत घेतली म्हणजे 1-2 महिन्यात ती ढिली होऊन निकामी होऊन जाणार हे ठरलेलं.
वयाची पन्नाशी ओलांडली तरी इनरवेअर कोणती घ्यायची हे मला अजून उमजलेले नाही.
मुख्य समस्या म्हणजे इनरवेअरची ट्रायल घेऊन पाहू असे सांगायचीही हिंमत माझी कुठल्याच शोरुममध्ये आतापर्यंत झालेली नाही.
आधीच्या नाडीवाल्या चड्ड्या खूप चांगल्या होत्या. त्या किमान वर्षभर तरी चालायच्या. आताच्या 1-2 महिन्यात खराब होणार्या इनरवेअर मला तरी परवडत नाही का माहिती नाही… मात्र त्या विकत घ्यायला मन धजावतच नाही हे मात्र खरे।
मुलीकडून ३ हजार रुपयांची लिवाईस पॅन्ट घेण्यापेक्षा ४००/- रुपयांची इनरवेअर घेतली अन मझेत ..सुखावुन , एटित शोरूम च्या बाहेर पडलो…
-आनंद मल्हारा


