Invite death with heart

Invite death with heart

  • 122 Views

जगा आनंदाने मृत्यूपूर्वीही..
जगा आनंदाने मृत्यूनंतरही..

हे आपण ऐकलं आहे पण…

अनुभवा आनंदाने मृत्यूलाही…
आमंत्रण द्या आनंदाने मृत्यूलाही…

हा नवा साक्षात्कार ही होऊ शकतो याची प्रचिती दिली आपल्या शहरवासियाने… एका वीर भारतीयाने..!

मृत्यू प्रत्येकाला येणार हे अधोरेखीत आहे. पण आपण त्या क्षणाला कसं साजरा करू शकतो…. गृहस्थाश्रम अवस्थेत मिळविलेल्या ऐश्वर्याच्या सुखापेक्षा वानप्रस्ताश्रमाकडे जताना त्यातुन मुक्त होण्याचा… सुखाचा त्याग करण्याचा आनंद किती मोठा असतो, ह्याचं आगळं – वेगळं उदाहरण महाराष्ट्रातील एक व्यापार या ने आम्हाला समजावून दिले.

जे जे मिळालं ते परत देऊन झाल्यावर चक्क यमराजा लाच आवाहन करायचे, की येरे राजा मी तुझं स्वागत करायला उभा आहे. लवकर ये.. मला तुझ्यासोबत घेऊन चल. मला पुढ चे जग.. स्वर्ग, नर्क किंवा आणखी काय असेल ते अनुभवायचं आहे. त्यालाही जगायचं आहे. असं धाडसाने म्हणणारी एक मारवाड़ी व्यक्ती आपल्यातलीच होती, हे आपलं भाग्य नव्हतं काय!

बिचारा यमराजही टेंशन मधे आला असेल…. प्रत्येकाकडे गुप्तपणे इनकम टॅक्सवाल्या सारखी रेड मारुन समोरच्या व्यक्तीला चक्क ऊचलुन नेणे हा त्याचा कर्तव्याचा भाग असेल. मात्र त्याला कोणी प्रार्थना करुन स्वत:हून बोलावतो, आनंदाने विनवणी करतो, याचा त्याला चक्कर आल्या सारखे सारखे झाले नसेल का?

आणि अशा अत्यंत धाडसी, सृजनशील, सकारात्मक व्यक्तिला कसं न्यावं? कुठे न्यावं? कुठे ठेवावं? कसं ठेवावं? याच्या तयारीतच यमराजाला ३२ दिवसांचा कालावधी लागला असावा किव्वा ते दोनहि एक दूसरयआ सोबत मैत्री ने खेळत असतील असे मला तरी वाटतं.

त्या थोर व्यक्तिमत्वाची भेट घेण्याचं भाग्य मला लाभलं नाही. त्यांनी दिलेली धर्माची सर्वोच्च परिक्षा व त्यांना मिळालेली सर्वोच्च पदवी व त्यानंतर त्यांनी मृत्यूशी केलेल्या मैत्रीबद्दल मी सर्वच ठिकाणी ऐकत वाचत होतो. मी मित्रांना विचारलेही, ते बोलतात का… वगेरे? तर त्यांनी मौन पाळल्याचे समजले. त्यामुळे भेटणा-यांची गर्दी असेल, म्हणून ते राहून राहून गेले. अंत्यविधी संदर्भात पेपरला बातमी होती. डोलीची मिरवणूक, पार्किंगची सुविधा. तिथेही जाणे टाळले. विचार केला, की आणखीन भार कशाला?

माझं मन .. माझे तर्क मात्र मला खुण वत होतं, की हा अलौकिक, रहस्यमयी, प्रवास एकट्यालाच करावा लागतो. हा प्रवास स्वतः ला स्वतहा मधेच कारावा लागेल..

त्यांना आलेले अद्भूत अनुभव घेऊन ते अनंतात विलीन झाले. त्यांच्या यूनीक पार्थिवाच्या अभ्यासातून युवा डॉक्टर जसे वंचित राहिले तसे आपणही त्यांच्या अनुभवाला मुकलो.

आम्ही वडिलांसोबत मृत्यूबद्दल बोलायचो, जगण्याबद्दल बोलायचो. प्रेमाबद्दलही बोलायचो. मात्र मृत्यूचं असं स्वागत होऊ शकतं, सोहळा साजरा केला जाऊ शकतो, वरात निघु शकते ..

मृत्यूलाही अमरत्व प्राप्त करुन देता येऊ शकतं *…

याची अनुभूती देणा-या माझ्या जळगावच्या महावीर च्या वीर आत्म्याला शतश: नमन!

त्यांना .. त्यंच्यातले सुप्त गुण अनुभवण्यासाठी त्यानचे वारसदार श्री. अनिलभाई व परिवार आपल्या सोबत आहेत. आपण भाग्यवान आहोत…म्हणतात ना.. Life is beautiful!

– आनंद मल्हारा