The best gift of birth day!

The best gift of birth day!

  • 159 Views

वाढदिवसाची सर्वात चांगली भेट !!

वाढदिवसानिमित्त आलेल्या शुभेच्छा संदेशांना काल रात्री रिप्लाय देत असतांना जवाईबापूंचा फोन आला.

त्यांनी विचारले, ”
“पापा, आज सबसे अच्छा गिफ्ट क्यामिला?,

हे ऐकून मी थोडा बुचकड्यात पडलो. दिवसभरातील घडमोडींकडे मागे वळून पाहिले. आज फेसबूक, व्हॉटस् अ‍ॅपवर शुभेच्छांचा वर्षाव होता…. शब्द, रंग, फोटो, फुलांच्या माध्यमातून .अनेक मित्र प्रत्यक्ष भेटायला आले होते. अनेकांनी फोनवर शुभेच्छा देऊन माझा आजचा दिवस संस्मरणीय बनविला. माझ्या स्टाफनेही कलाकंद चा स्पेशल केक आणून वाढदिवस साजरा केला.

पण सो कॉल्ड गिफ्ट वगैरे तसं काही मिळालं नव्हतं. (आदल्या दिवशी मुलींनी जे विकत घेऊन दिलं ते सोडलं तर) त्यामुळे जावाईबापुंना काय उत्तर द्यावं हे सूचत नव्हतं.थोडा विचार करुन मग सांगितलं,

“हार्दिकजी दो नयी चिजे घटी आज मेरे साथमें, जिसे हम खास कह सकेंगे.”

त्यातली पहिली घटना होती जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष
श्री. अशोकभाऊ जैन यांचा शुभेच्छांसाठी फोन येणं. त्यांच्या शुभेच्छांनी मी सुखावून गेलो. कारण अशोकभाऊंना मी लहानपणापासून मित्र मानत आलो आहे.मैत्रीमध्ये व्यवहार नसलेला बरा’ असे म्हणतात. मात्र मल्हारचा कोणताही प्रोजेक्ट श्री. अशोकभाऊ जैन यांच्या म्हणजेच जैन उद्योग समूहाच्या सहकार्याशिवाय साकार झालेला नाही, हे ही तितकेच खरे. तसा भाऊंचा फोन येतो मात्र तो कामासंदर्भात असतो तर कधी मंगलकार्या साठी आमंत्रण देण्या संदर्भात! याव्यतिरीक्त इतर कुठल्या कारणासाठी त्यांचा फोन आलेला मला आठवत नाही. त्यात आता तर ते कामाच्या व्यापात इतके व्यस्त असतात, की आपण तसली अपेक्षाही करु शकत नाही. मात्र माज्या मनात जे काही चांगले वाइट , इकडचे तिकडचे येत असते ते मी त्यांच्यासोबत फोनवर तर कधी पत्र पाठवूनही शेयर करीत असतो.मात्र काल आलेल्या त्यांच्या फोनने मित्रत्वाच्या नात्यावर प्रेमाची शिंपड घातली असे मला वाटते.

दुसरी वेगळी गोष्ट घडली ती म्हणजे, आपल्या जळगाव शहराचे प्रिय श्री. राजूमामा भोळे यांच्या स्वीय सहाय्यकांचा सदिच्छांसाठी आलेला फोन. शुभेच्छा देऊन त्यांनी सांगितले, की मामासुद्धा आपल्याला थोड्या वेळात फोन करतीेल, .. मामांचा फोन येणं ही सुद्धा एक वेगळी घटना होती माझ्यासाठी. माझं कार्यक्षेत्र वेगळं आणि त्याचं वेगळं आहे. तसं मी त्यांना काही कामासाठी, मदतीसाठी हक्काने फोन करीत असतो. तेही त्याला होकार देत असतात. शिवाय तनयचे व त्यांचे कनेक्शन मागील काही वर्षा मध्ये चांगले जुडलेत कारण जिथे मामा तिथे अनेकदा तनयही उपस्थित राहायचा. तरीही शुभेच्छा देण्यासाठी राजूमामांचा फोन येणार हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं. त्यांच्या फोनच्या मैसेज ने ही मी सुखावलो होतो.

हे ऐकून आमच्या जावाईबापुंना काय वाटलं असेल माहिती नाही.

मात्र मागील वर्षभरात जे काही कर्म आपल्या हातून घडले ते लोकांना जोडणारे, आनंद देणारे असेल म्हणून कदाचित हे फ़ोन आले असतील असा अर्थ मी त्यातून काढून मोकळा होत आहे.

आणि हो वाढदिवसानिमित्त सर्वच माध्यमातून मला शुभेच्छा देणारे, माझ्यावर प्रेम करणा-या आपल्या सर्वांच्या मी ऋणात राहू इच्छितो. आपला स्नेह सदैव असाच वृद्धिंगत होत राहावा, हीच अपेक्षा!

धन्यवाद!

आपला,
आनंद मल्हारा